दणका ; अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली ! | सरपंच बसवराज पाटील यांच्या मागणीचा परिणाम !
जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समिती येथे मनरेगा घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या प्रवीण माने यांना पुन्हा जत पंचायत समितीलाच सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या नियुक्ती विरोधात सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने अखेर अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याची तडकाफडकी सांगली जिल्हा परिषदेकडे बदली करण्यात आली.

यावेळी बोलताना सरपंच बसवराज पाटील म्हणाले की, वादग्रस्त अथवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जत तालुक्यात कोणत्याही खात्यात नियुक्ती शासनाने करू नये अन्यथा यापुढेही आम्ही आवाज उठवू इथून पुढे जे जे अधिकारी कर्मचारी वर्षानुवर्षे जत तालुक्यात ठाण मांडून बसलेत त्यांच्या बदलीसाठी लढा उभारू!
