ऑल इंडिया पँथरच्या जत‌ तालुका महासचिवपदी प्रमोद काटे

0माडग्याळ, संकेत टाइम्स : जाडरबोबलाद (ता.जत) येथील प्रमोद काटे यांची जत तालुका ऑल इंडिया पँथर महासचिवपदी निवड करण्यात आली. जतचे नगरसेवक व दलित पँथरचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्याहस्ते काटे यांचा सत्कार करण्यात आला. काटे यांनी जाडरबोबलाद येथे आशा सेविका, ग्रामपंचायत, कोरोना योद्धा यांना किट,मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी केली.

 नगरसेवक कांबळे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना किट,मास्क,सॅनिटायझरचे वाटप केले.यावेळी जत तालुकाध्यक्ष अमर कांबळे, तालुका सचिव विकी वाघमारे,तालुका कार्याध्यक्ष सुनील कांबळे,ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश काटे,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार, ऑल इंडिया पँथरचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Rate Card


दलित पँथरचे महासचिव प्रमोद काटे यांच्यावतीने जाडरबोबलाद येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.