बियरशॉपी परवान्यासाठी बोलविली विशेष सभा ; उमेश सांवत | राज्यातील पहिलीच‌ नगरपरिषद

0

जत,संकेत टाइम्स : एकीकडे कोरोनाच प्रभाव कायम असताना जत नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आपल्या अकार्यक्षमतेचा कळस केला आहे. ज्या काळात कोरोना रोकण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.तेथे भ्रष्ट कारभार असणाऱ्या ठेक्याला मुदतवाढ देणे,कमिशन मिळणाऱ्या कामांना मंजूरी देण्यासाठी व देशात प्रथमच थेट सभेच्या अंजेट्यावर बिअरशॉपीला परवाना देण्याचा मुद्दा आणण्यात आला आहे. 

देशातील पहिली अशी नगरपरिषद आहे,जेथे दारूच्या दुकानाला मजूंरी देण्यासाठी विशेष सभा आयोजित करावी लागत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक उमेश सांवत यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणीही सांवत यांनी केली आहे.

सांवत म्हणाले,जत शहराला सत्ताधारी मंडळीनी अगोदरचं भष्ट्राचाराचे केंद्र बनविले आहे.


नगरपरिषदेच्या ठेके,विकासकामात भ्रष्ट कारभार नाही असे एकही काम राहिलेले नाही.गेल्या चार महिन्यापासून नगरपरिषदेची मासिक सभा घेण्यात आली नव्हती.त्यामुळे भ्रष्ट कारभाराची चर्चा थांबली होती.मात्र चार महिन्यानंतर नगरपरिषदे कडून विशेष सभेच्या नोटिसा नगरसेवकांना पाठविण्यात आल्या आहेत.

अशा विशेष सभा आपातकालीन परिस्थितीत बोलविल्या जातात.मात्र जत नगरपरिषदेची अशी आपातकालीन सभा बियरशॉपीला परवानगी देण्यासाठी बोलविण्यात आली आहे.हा प्रकार नगरपरिषदेला काळिमा फासणारा आहे.


सांवत म्हणाले,विशेष सभा घेऊन नगर परिषदेचे पदाधिकारी पुन्हा धनकचरा,सफाई कामाच्या निविदेस मुदवाढ देणे,विशेष अनुदानातून आलेल्या निधीतून विकास कामासाठी चर्चा करणे,बियरशॉपीला परवाना देण्यासाठी सभा घेण्यात येणार आहे.

भारतात गंभीर रूप धारण केलेल्या कोरोनाच्या काळातील आपातकालीन सभेत कोरोनाच्या उपाय योजनासाठी विषय अंजेठ्यावर येणे अपेक्षित होते,मात्र त्या विषयांना बेदखल करत किंबहुना कोविडमुळे नागरिकांचा मुत्यूकडे दुर्लक्ष करत वरकमाई करणारे ठेके, विकास कामाचे विषय पत्रिकेवर आणण्यात आले आहेत.

Rate Card


सांवत म्हणाले, नगरपरिषद हद्दीत वाईन शॉप,बियर दारू दुकाने अगोदर कार्यरत आहेत,त्यात नव्याने अशी दुकाने सुरू होऊ शकतात.मात्र एकाद्या बियरशॉपीसाठी विशेष सभा बोलविणारी राज्यातील पहिली जत नगरपरिषद आहे.हा सत्ताधाऱ्यांचा निर्लज्जपणा असून कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीत सध्या नगरपरिषदेकडे शववाहिका नाही,मृत्त लोकांचे मृत्तदेह घंटागाडीतून नेहावे लागत आहेत. त्याशिवाय नागरिकांना वाचविण्यासाठी उपाययोजनाच्या विषय सभेत घेण्याची गरज होती.


सांवत म्हणाले,

सत्ताधाऱ्यांच्या अशा भ्रष्ट कारभाराला कंटाळून आतापर्यत चार मुख्याधिकाऱ्यांनी बदली करून घेतली आहे,विशेष म्हणजे सध्या ज्यांच्याकडे नगरपरिषदेचा पदभार आहे.ते तहसीलदार सचिन पाटील यांनाही या विशेष सभेची माहिती नाही,हे विशेष आहे.त्यामुळे आम्ही तहसीलदार पाटील यांना याबाबत‌ निवेदन दिले आहे, त्यांनी कारवाई करावी, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागू, रस्त्यावर उतरून विरोध करू,असा इशाराही सांवत यांनी दिला आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.