तु मला आवडतेस….. केबिनमध्ये चल | वरिष्ठ आरोग्य निरीक्षकावर गुन्हा दाखल

0
4
मी तुला नोकरीत सवलत देतो, तुला वेळोवेळी सुट्ट्या देतो, तू मला खूप आवडतेस, माझे तू एक काम कर, माझ्या सोबत बंद केबिनमध्ये चल, असे म्हणत पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय: ५५ वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३० सप्टेंबर रोजी महिला कर्मचारी कार्यालयात एकटी असताना चंद्रकांत लाड त्या महिला कर्मचाऱ्याकडे गेला व केबिनमध्ये येण्यास सांगू लागला. त्यावेळी संबंधित महिलेने केबिनमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर,” मी तुला कामात सुट देतो. पाहिजे तेव्हा सुटी देतो. त्यामुळे तू माझे एक काम कर, केबिनमध्ये चल,” असे चंद्रकांत लाड त्या कर्मचारी महिलेला म्हणाला.
दरम्यान, घाबरलेल्या महिलेने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय याबाबत अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सिंहगड रस्ता परिसरात खळबळ उडाली असून या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारदार महिलेची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
संबंधित तक्रारदार महिला ही गेल्या दीड वर्षांपासून सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कायमस्वरुपी सेविका म्हणून कामास आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच यापूर्वीसुद्धा त्यांच्यावर गैरवर्तनाच्या तक्रारी असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडेसुद्धा तक्रार दिली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here