नगरपरिषदेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे खासदारांचे आश्वासन
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील विविध विकास कामासंदर्भात आमदार विक्रमसिंह सांवत यांनी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाच्या समवेत खा.संजयकाका पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची भेट घेत चर्चा केली.
खा.पाटील व डॉ.चौधरी यांनी विकासकामा संदर्भात सहकार्य करण्याचे शिष्ट मंडळाला आश्वासन दिले आहे.

शहरात उभा करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तयारीचा आढावा घेतला. त्याशिवाय शहरात नव्याने होणाऱ्या कामासंदर्भातील अडचणी,निधी उपलब्धते बाबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी,महादेव कोळी,निलेश बामणे,राहुल काळे उपस्थित होते.
सांगली : जत नगरपरिषदच्या विविध कामासंदर्भात खा.संजयकाका पाटील यांची आम.सांवत यांच्या सह शिष्ट मंडळाने भेट घेतली.
