जतेत भाजप कार्यकर्त्यामध्ये‌ राडा | आयात उमेदवार विरूध भूमिपुत्र असा वाद पेटलाय !

0
10
जत : जत भाजपामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठा राडा झाला.भूमिपुत्र उमेदवाराला उमेदवारी द्यावी,अशी मागणी होत असतानाच आ.पडळकर व रवीपाटील गटात गोधळ उडाला.जत भाजप बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.त्यांचा भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली.
आज रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉ. रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बुथप्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील, प्रभाकर भाऊ जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण,अभिजित चव्हाण, शंकर वगरे, बसवराज पाटील, यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते.

 

सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते.डी.एस.कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षांने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे. भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील, अशी भूमिका मांडली. यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला? असा जाब बिळूर येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगोंड यांनी विचारला.जखगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली. यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे.ते त्यांचे विचार मांडत आहेत, तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली.

आम्हीही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच.मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले. त्यांनी त्यांच्या हातातिल माईक हिसकावुन घेतला.तसेच डायस ओडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला.तम्मनगौडा रवीपाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आल्याने त्यांच्यात व पडळकर समर्थकांची झोबाझोबी,हाणामारी झाली.ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली.दरम्यान भूमिपुत्र व आयात उमेदवार यापुढेही तीव्र होणार हे स्पष्ट झाले आहे.
बाहेरच्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये
जत तालुक्यातील भूमिपुत्र सक्षम असून पक्षांच्या शिस्तीला बाहेरच्यांनी येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here