संख : संख (ता जत ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास महाराष्ट्र शासनाचा सन २०२३-२४ या वषाचा कायाकल्प पुरस्कार मिळाला. पन्नास हजारांचे बक्षीस मिळाले आहे.सर्वोत्तम आरोग्य सुविधा, रुग्णसेवा आणि पर्यावरणपूरक वातावरण भौतिक सुविधा या निकषावर हा जिल्हा पुरस्कारा दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
संख येथील प्राथमिक आरोग्य केद्र संख अंतर्गत एकूण १७ गावे येतात त्या मध्ये अंकलगी,मुचंडी,दरीबडची, आसंगी तुर्क, मोठेवाडी, खंडनाळ, आसंगी (जत ) असे एकूण १७ गावे येतात.ही गावे या आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येतात आरोग्य केद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.सुशांत बुरुकुले तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.नूतन चव्हाण हे कार्यरत आहेत.
सरासरी रोज शंभर ते दीडशे बाह्य रुग्ण तपासली जातात राज्य शासनाच्या आरोम्य विभागाने कायाकल्प या स्पर्धेंचे आयोजन केले होते.यामध्ये उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र,अशा सर्व रुणालयाचा सहभाग होता. यामध्ये या प्राथमिक आरोग्य ‘केंद्राने सहभाग नोंदवला होता. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणा्या आरोग्य सुविधा, रुण्ण सेवा, अंतबहिय स्वच्छता,दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा,आपत्कालीन सेवा, तत्पर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, परिचारिका, व औषध पुरवठा, स्वच्छता असा सर्व पातळीवरील कामाची पाहणी करण्यात आली.
राज्य शासनाचा सन २३-२४ या वर्षीचा कायाकल्प पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र,संखला मिळाला आहे.या पुरस्काराने आम्हा सर्वाची जबाबदारी वाढली असून गुणवत्तापूर्ण व विनम्र सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत.डॉ.सुशांत बुरुकुले,डॉ.नूतन चव्हाण (वैद्यकीय अधिकारी)