जत तालुक्यातील मनरेगा घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रवीण मानेला कोणत्या गोमूत्राने पवित्र केले ; बसवराज‌ पाटील यांचा‌ सवाल

0जत,संकेत टाइम्स ; पंचायत समिती जत येथे सहाय्यक लेखा अधिकारीपदी नेमणूक करत मनरेगा ‌घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रविण माने यांना कोणत्या गोमूत्राने पवित्र करून हजर करून घेतले,असा‌ संतप्त सवाल संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी प्रशासनाला विचारला आहे.मानेच्या नेमणूकी विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले,जतच्या‌ पंचायत समितीच्या राज्यभर गाजलेल्या मनरेगा‌ घोटाळ्यात दोन गटविकास अधिकाऱ्या बरोबर प्रविण माने हाही संशयित आरोपी आहे.
Rate Cardअशा भष्ट्र अधिकाऱ्यांच्या मुळे तालुक्याला वरदान ठरणारी मनरेगा योजना बंद पडली आहे.

मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार करत‌ स्व:ताचे घर भरून तालुक्याची राज्यभर बदनामी करणाऱ्याला पंचायत समितीत‌ हजरचं कसे करून घेतले.

मानेला पंचायत समितीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पवित्र करून घेतले याबाबतही मी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे पाटील म्हणाले.
दुष्काळी तालुक्यातील गरीब शेतकरी,मजूरांना काम देणाऱ्या मनरेगा योजना बंद पाडण्याचे पाप माने सारख्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे जत तालुक्याचा सुमारे दहा कोटीवर निधीचे‌ नुकसान झाले आहे. तरीही अशाच भ्रष्ट्र संशयित आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांला पुन्हा सहाय्यक लेखाधिकारी म्हणून हजर करून घेतले‌,जंगी स्वागत समारंभही घेतला  जातो,यापेक्षा या तालुक्याचे दुसरे दुर्देव्य काय,सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.अशा तालुक्याला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांला आमदार विक्रमसिंह सांवत व सभापती मनोज जगताप यांनी जिल्हा परिषदेकडे परत पाठवावे,अन्यथा आंदोलन करू असा इशारा पाटील‌ यांनी दिला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.