रुग्ण संख्या स्थिर मात्र भिती कायम | जतेत गुरूवारी 67 नवे रुग्ण,दोन मुत्यू
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवार ता.3 रोजी 67 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव किंचित कमी झाला आहे. मात्र नव्या रुग्णचा आकडा स्थिरचं आहे.दुसरीकडे नव्याच्या दुप्पट 129 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दुर्देवाने गुरूवारी आणखीन दोघांचा मुत्यू झाला आहे.गुरूवापर्यत 1463 रुग्ण उपचाराखाली आहेत.

त्यापैंकी 1277 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.एकीकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक दिवसानंतर दुकाने खुली झाल्याने गर्दी होणे अपेक्षित आहे,मात्र कोरोना नियमाकडे दुर्लक्ष करणे भिती वाढविणारे ठरणार आहे.पोलीस,नगरपरिषद,ग्रामपंचायतीनी सतर्क रहाणे आता अंत्यत गरजेचे बनले आहे.
