गाव कोरोनामुक्त करा 50 लाख जिंका ;राज्य सरकारकडून घोषणा

0
6



मुंबई : कोरोनाची दुसरी लाट संपते तोवरचं तिसरी भयानक प्रभाव दाखविणारी लाट पुन्हा एकदा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून उपाय योजना सुरू आहेत.ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला होता.त्यामुळे सरकारने या भागात जनजागृत्ती करण्याबरोबर कोरोना मुक्त राहणाऱ्या गावांना 50 लाखाचे बक्षिसाची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.






ग्रामीण भागात‌ कोरोनाबाबत‌ ग्रामपंचायतीना या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक‌ गावांना कोरोनाचा विळखा पडला होता.त्यामुळे गावात 

कोरोना रोकण्यासाठी ग्रामपंचायतीकडून या प्रोत्साहन बक्षिसामुळे गतीने उपाययोजना होऊन गावे कोरोना मुक्त होतील अशी आशा शासनाला वाटत आहे.






गावे कोरोना मुक्त‌ राहिली तर तालुका,जिल्हा,राज्य स्तरावर यंत्रणेवर ताप कमी होईल,शिवाय नागरिकांचा जीव वाचविणे शक्य होईल.त्यामुळे या कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here