जत तालुक्यात ‌वाळू तस्करी वाढली | हप्तेबाजीमुळे कारवाईला खो | वाळू तस्करांचा थेट अधिकाऱ्यांच्या दालनात वावर

0जत,संंकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाच्या महामारीतही अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या तस्करीच्या वाळूची खुलेआम वाहतूक सुरू असून, तालुका प्रशासनाने याकडे डोळेझाक करीत महसूल वसुली एवढेच टार्गेट ठेवल्याचे दिसते.


महसूल, पोलीस अधिकारी महसूल गोळा करण्यात गुंग असल्याचे चित्र जत तालुक्यात सर्रास पाहावयास मिळत आहे. जत तालुक्यातील बोर,कोरडा नदीसह,कुडणूर,डोण,

मिरवाड अनेक गावातील ओढापात्रात खुलेआम अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग मात्र डोळ्यावर हात ठेवून झाेपल्याचे सोंग करत आहे.

एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अवैध धंद्यांचा बाजार वाढत आहे. महसूल अधिकारी, पोलीस यांच्याशी अवैध धंद्येवाल्यांचे लागेबांधे असल्याने वाळू तस्करी खुलेआम असल्याचे दिसत आहे. या अवैध वाळू तस्करीकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले असून, निष्पाप जनतेला मात्र या अवैध वाळू वाहतुकीचे नुकसान सहन करावे लागत आहे.दोन्ही कार्यालयाकडून वसूली कर्मचारी नेमणूक


जत,संख या दोन्ही महसूलच्या कार्यालयाकडून वाळू त‌स्करीला बळ दिले जात आहे.वाळू तस्करांना खुले रान देण्यासाठी महिन्याला पाच ते 15 हजारापर्यत‌ हप्ते ठरविल्याची चर्चा आहे. यात अधिकाऱ्यापासून तलाठी,कोतवाल,पोलीसही गुंतले आहेत.वाळू तस्कर सर्वान इमानइतबारे हप्त्याची रक्कम पुरवत असल्याने सर्वांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे.जत तहसील कार्यालयात तर एका कर्मचाऱ्यांची वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करण्यासाठी नेमणूक‌ केल्याची चर्चा आहे. 


Rate Card

वाळू तस्करांचा थेट अधिकाऱ्यांच्या दालनात वावर


कोरोनाचे कारण देत सामान्य जनतेला शासकीय कार्यालये बंद असल्याचे सांगण्यात येत,मात्र शहरातील काही मुजोर वाळू तस्कर ज्यांची वाहने पकडण्यात आली आहेत. अशा तस्करांचा थेट अधिकाऱ्यांच्या दालनात वावर बरचं काही सांगून जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.