नोकरीतील पदोन्नती आरक्षण रद्दच्या निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांची नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 जून 2021 रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि,राज्य सरकारने आरक्षण शिवाय सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त जागा भरण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून हा निर्णय घटनाबाह्य आहे.भारतीय राज्यघटना कलम 16 मधील उपक्रम 1 ,2 ,3 ,4 ,(4अ)(4ब) व कलम 141, 144, 135 च्या विरोधात आहे त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षित पदे तात्काळ बिंदुनामावली प्रमाणे भरण्यात यावीत.मराठा आरक्षण प्रमाणेच मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.
त्यामुळे मागास वर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांना या पदावरून हटवावे. आरक्षण समितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यास द्यावे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमावी सन 2018 रोजी च्या सुप्रीम कोर्टाचा न्यायनिवाडा नुसार पदोन्नती आरक्षण व इतर जागा बिंदुनामावली प्रमाणे भराव्यात मागासवर्गीय पदोन्नती बिंदू मध्ये बिंदु नामावलीचा उपक्रम आहेे. त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी सप्टेंबर 2018 च्या चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडा नुसार जाती-जमाती यांना मागासलेपणा सिद्ध करण्याची गरज नाही.

त्यामुळे तात्काळ मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करावी दिनांक 7 मे 2019 रोजी महाराष्ट्र शासनाचा अन्यायकारक झालेला निर्णय सरकारने मागे घ्यावा,अशा
मागण्याबाबत शासनचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,बहुजन विद्यार्थी परिषदचे आघाडी तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे,बादल कांबळे व इतर रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.
जत : नोकरीतील पदोन्नती आरक्षण रद्दच्या निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
