इंग्लंड मधील भारतीय बांधवाकडून जतला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
जत,संकेत टाइम्स : रॉयल सटन इंडियन्स, बर्मिंघम आणि युथ फॉर जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत येथील ग्रामीण रुग्णालय यांना 2 ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट देण्यात आले. या मशीनचे उदघाटन आरोग्य अधिकारी डॉ.अशोक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी या मशीनचा वापर गरीब व गरजू नागरिकांना उपचार करण्यासाठी होईल असे सांगीतले.
युथ फॉर जत चे संस्थापक सदस्य श्री अजय पवार यांच्या प्रयत्नातून इंग्लंड मधील अनिवासी भारतीय बांधवांनी आपल्या जन्म भूमीसाठी हि मदत पाठवली आहे.हे ऑक्सिजन काँसंट्रेटर प्रदान करण्याचा कार्यक्रम आज ग्रामीण रुग्णालय जत येथे पार पडला.
कार्यक्रमाला जतचे आमदार विक्रम सावंत,प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, युथ फॉर जतचे अध्यक्ष दिनेश शिंदे, उपाध्यक्ष राजकुमार म्हमाणे, सचिव अमित बामणे व इतर सदस्य सचिन जाधव, प्रदीप साळुंखे, प्रमोद साळुंखे,सतिश तंगडी, जितेंद्र बोराडे सर इत्यादी उपस्थित होते.

जत : इंग्लंड मधील भारतीय बांधवाकडून जतला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
