जत तालुक्याला मोठा दिलासा,बुधवारी नवे रुग्ण 50 च्या आत | 5 रुग्णाचाही मुत्यू
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी नव्या कोरोना बाधित रुग्णाचा आकडा 50 च्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत असल्याने 1जून पासून कडक निर्बंध जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी शिथील जीवनावश्यक वस्तूची दुकाने 4 तास उघडण्याची सुट दिली आहे.जत तालुक्यातही कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमी होत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत 47 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर 5 जणांचा मुत्यू झाला आहे.
तब्बल 105 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
सध्या 1527 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
एंकदरीत तालुक्याला बुधवारी रुग्ण संख्या मोठा प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जत 5,अचनहळ्ळी 5,डफळापूर 1,रावळगुंडेवाडी 1,उमराणी 4,साळमळगेवाडी 3,बिळूर 3,बेवनूर 3,कुंभारी 1,कोसारी 1,हिवरे 1,बनाळी 1,जा.बोबलाद 5,सोरडी 3,माडग्याळ 1,व्हसपेठ 1,संख 1,आंसगीजत 1,पांढरेवाडी 1,अंकलगी 1,उमदी 2,करेवाडी ति.1,भिवर्गी 1 असे 23 गावात एकूण 47 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे तालुक्यातील संख्या 9781 वर पोहचली असून त्यातील 8038 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यातील 216 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.
