बापूचे‌ कार्य दिग्विजय चव्हाण पुढे प्रभावीपणे चालवित‌ आहेत ; आ.विक्रमसिंह सांवत | पाचशे गरजू कुंटुबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

0डफळापूर, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील मोठे नेते असलेले स्व.

सुनिलबापू चव्हाण यांचे विचार त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण प्रभावीपणे पुढे नेहत आहेत,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात आ.सांवत बोलत‌ होते.डफळापूर पंचायत समिती गणातील सर्व आशा वर्कर्स,अंत्योदय कार्डधारक कुंटुबियांना जीवनावश्यक सुमारे 500 किटचे वाटप करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,राजे विजयसिंह कारखान्याचे संचालक राजारामबापू चव्हाण,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर भोसले,युवा नेते अरविंद गडदे,सोसायटीचे संचालक रमेश पाटील,राजकुमार भोसले,चव्हाण कस्ट्रक्शनचे बाळासाहेब चव्हाण,ग्रा.प.सदस्य देवदास पाटील,अजित पाटील,सावध पाटील,शेगावचे नेते महादेव सांळुखे,धनाजी चव्हाण,कॉ.हणमंत कोळी,कॉ.मिना कोळी,अशोक भोसले,उत्तम संकपाळ,अब्दुल मकान दार,दिपक चव्हाण,तानाजी चव्हाण,राजू महाजन,यशवंत शिंदे,सागर चव्हाण, धिरज‌ पाटील,हर्षवर्धन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


आ.विक्रमसिंह सांवत म्हणाले,

कोरोनाच्या महामारी रोकण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशांचे कार्य उल्लेखनीय आहे.

अशा आशांना मदतीची गरज आहे.आम्ही राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.आमचे राजकारणातील गुरू असणारे सुनिलबापू चव्हाण ‌यांचे विचार पुढे दिग्विजय चव्हाण चालवित आहेत.बापूची काम वेगळ्या पध्दतीने ख्याती होती.ती आजही आम्हाला मार्गदर्शक ठरत आहे.


आ.सांवत म्हणाले,तालुक्यात सध्या कोरोना प्रभाव संपविण्यासाठी आम्ही तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना आम्ही कॉग्रेस पक्षाच्या वतीने मदत करत आहोत.आमचा प्रत्येक कार्यकर्ता लोकांना मदतीसाठी पुढे आहे.त्यापलिकडे विरोधी पक्षाचे कुठेही कार्य नाही,केलेले कामही त्यांना रुचत नसल्याने खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत.

राजकारणावेळी राजकरण करा,आता सध्याची परिस्थिती लोकांना मदत करण्याची गरज आहे,असे आवाहनही आ.सावंत यांनी केले.

Rate Card


महादेव पाटील म्हणाले,

अरविंद धरणगुत्तीकर म्हणाले, आम्ही अधिकारी म्हणून फक्त कार्यालयातून काम करत आहोत.मात्र आमच्या आशा भगिनी कोरोनात प्रत्येक रुग्णापर्यत जाऊन त्याची तपासणी करत आहेत.त्याच खऱ्या योध्दा आहेत.

त्यांच्या प्रोत्साहन मानधनासाठी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी माझ्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता.त्याशिवाय आशांच्या हक्कासाठी लढणारे कॉ.हणंमत‌ कोळी यांच्याही सातत्याने पाठपुरावा केला होता.

प्रत्येक गावातील आशांना ग्रामपंचायती कडून प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी मी आदेश दिले आहे,जवळपास सर्व ग्रामपंचायतीने त्यांना हा भत्ता दिला आहे. दिग्विजय चव्हाण यांच्यासारखे नेत्यांनी धोका पत्करून काम करणाऱ्या अशा मदतीसाठी पुढे‌ यावे. 


स्वागत बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण तर सुत्र संचालन सुरेन्द्र सरनाईक यांनी केले.

यावेळी सुरेंद्र सरनाईक,सुभाष पाटोळे,उत्तम संकपाळ,गणेश पाटोळे,नामदेव जानकर,कल्लाप्पा कोळी,आशा वर्कर नजमा शेख आदीचा 1 जूनला वाढदिवसा निमित्त सत्कार आम दार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 

डफळापूर : पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आम दार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला, वाढदिवासा निमित्त आशा वर्कर्स यांना जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.