येळदरीनजिक अपघातात एकजण ठारएका विरोधात गुन्हा दाखल

0जत,संकेत टाइम्स : जत‌ शहरापासून जवळ असणाऱ्या साळमळगेवाडी येथे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेला अपघातात एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.रवी आकाराम चव्हाण (रा.बिळूर) हा जागीच ठार झाला आहे.याप्रकरणी जत पोलीसांनी प्रविण गुरूबसू कोट्टलगी यांच्याविरोधात‌ गुन्हा दाखल केला आहे.घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.


अधिक माहिती अशी, 

मयर रवि चव्हाण व भैरू जावीर हे महिद्रा डुरो(क्र.एमएच 09,डीएच 25) जतहून बिळूरकडे चालले होते.तर प्रवीण कोटलगी व त्याची आई विना क्रमांकाच्या बुलेटवरून भारती जतकडे येत होते.दरम्यान येळदरी नजिकच्या साळमळगेवाडी येथे दोन्ही दुचाकीत समोरा समोर धडक झाली.धडक इतकी भिषण होती की दोन्ही दुचाकी चालविणारे व पाठीमागील उडून बाजूला पडले होते.त्यात रवी चव्हाण यांना डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला तर दुसरा दुचाकी स्वार प्रविण कोटलगी यांना गंभीर दुखापत झाली आहे.


Rate Card

त्यांना सांगली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर भारती कोटलगी,भैरू जावीर हे दोघे‌ जखमी झाले आहेत. दरम्यान अचानक घटलेल्या या घटनेत एकाचा मुत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत रवि चव्हाण यांचे भाऊ भारत आकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेट चालक प्रविण कोट्टलगी यांने भरधाव गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा भादविस कलम 304(अ),279,337,427,एम व्ही.अँक्ट 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.