कृषी माळरान महोत्सवाची सांगता
जत : कृषी माळरान महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी माडग्याळ मेंढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला जत तालुक्यातील शेतकरी, महिलावर्ग, आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माडग्याळ मेंढी ही जत तालुक्याची एक गौरवशाली प्रजाती आहे, जी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आढळते. या प्रजातीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवात माडग्याळ मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. जिथे अनेक मेंढ्यांनी सहभाग घेतला आणि पारितोषिके मिळवली. माडग्याळ मेंढीला जीआय मानांकन मिळवण्यासाठी विधिमंडळात मुद्दा आपण सर्वात प्रथम मांडला होता.
जर ही मान्यता मिळाली तर माडग्याळ मेंढीला शासकीय रेकॉर्डवर एक स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद होईल.आजच्या कार्यक्रमात या मेंढ्यांच्या आकर्षक आणि सुबक रूपाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महोत्सवात जत तालुक्यातील शेतकरी, महिलावर्ग, आणि अन्य नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा लाभ घेतला.