जत,संकेत टाइम्स : जत तालुका अद्याप लॉकडाऊनच आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या अद्याप अपेक्षीत कमी झाली नसल्याने निर्बंध कायम आहेत.
तालुक्यातील जत शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख स्थिर आहे.मात्र तालुक्यातील पॉझिटिव्ह रेट कायम आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हातील अत्यावश्यक असणारी दुकाने 7 ते 11 पर्यत कोरोना नियम पाळून चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात सध्या जत तालुक्यातील कोरोना चिंता कायम आहे.दररोज 80 ते 100 च्या पट्टीत नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय मुत्यू दर ही कायम आहे.त्यामुळे निर्बंधातील शिथिलता तुर्त जत तालुक्यात लागू होणार नसल्याचे चित्र आहे.सध्या तालुक्यातील मेडिकल,कृषी दुकाने,दवाखाने एवढीच प्रतिष्ठाने सुरू आहेत.तालुकास्तरीय स्थानिक प्रशासनाला निर्बधांची किती प्रमाणात आहेत.