बेदाणा सौदे सुरू नसल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्या

0संख : जत तालुक्यात बेदाणा निर्मितीला पोषक वातावरणामुळे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती होते. चालू हंगामात उत्तम प्रतीचा बेदाणा तयार झाला आहे. मात्र, शीतगृहांची सोय नसल्याने तो सांगली, तासगाव येथे ठेवला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सौदेबंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.जत तालुक्यात द्राक्षाचे 10 हजार 870 एकर क्षेत्र आहे.बेदाण्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढला आहे.
डफळापूर,बिळूर,बेंळूखी,कुंभारी,शेगाव,बनाळी, उमदी, बेळोंडगी, निगडी बुद्रुक, बालगाव, सुसलाद, हळ्ळी, सोनलगी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, संख, जालिहाळ बुद्रुक, कोंतेवबोबलाद या भागात बेदाणा निर्मिती केली जाते.माणिक चमन वाण, हिरवा रंग, साखरेचे प्रमाण अधिक,दोन सेंटिमीटरपेक्षा जास्त लांबी व फुगीरपणा ही येथील बेदाण्याची वैशिष्ट्ये आहेत. उष्ण व कोरड्या वातावरणामुळे बेदाणा लवकर सुकतो.त्याला रंग, चकाकी येते.लॉकडाऊनपूर्वी बेदाण्याचा सरासरी 150 ते 300 रुपये दर होता. कोरोनामुळे सौदे बंद आहेत.सध्या बागांची खरड छाटणी केली आहे. काड्या तयार करण्यासाठी रासायनिक खत, सेंद्रिय खत, औषध यावर खर्च करावा लागतो. उधारीवर औषधासाठी 20 ते 25 टक्के जादा दर लावतात. छाटणी, मशागतीला पैसे लागणार आहेत. शेतकऱ्यांना शीतगृहाच्या व्यापाऱ्यांनी एकरी पन्नास हजार ते एक लाखापर्यंत उचल म्हणून रक्कम दिली आहे.Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.