कर्तव्यसंपन्न अधिकारी ; एम.डी.जेऊर

0
2



जत पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी श्री.एम.डी.जेऊर जिल्हा परिषदेच्या प्रदिर्घ सेवेतुन आपले पारदर्शी,निष्ठेने व सचोटिने सेवा पुर्ण करुन दिनांक 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.जि.प.सेवेत जि.प.सांगली,पं.स.मिरज,पं.स.कवठेमंहकाळ,सर्वशिक्षण अभियान,बाल विकास प्रकल्प सेवा योजना कार्यालय बांधकाम विभाग पंचायत समिती जत या ठिकाणी अल्पकाळ सेवा केली आहे.




त्यांची प्रदिर्घसेवा पंचायत समिती जत कडील लेखाविभागात झाली असून त्यांची एकूण सेवा 37 वर्षी झाली आहे.लेखा विभागात काम करत असतांना त्यांचे समोर आलेले प्रत्येक काम देयक पुर्ण होण्याच्या दुष्टीने सकारात्मक दुष्टीकोणातून कसल्याही अडचणीच्या वेळी यावर मार्ग काढुन

नियम व कायद्याच्या चौकटीतून राहून ते पुर्ण करण्याच्या दुष्टीने कामकाज केलेले आहे.प्रशासन कर्मचारी/सामान्य जनता,अधिकारी व पदाधिकारी यांचेतील दुवा म्हणून कुठलीही कटुता न येता समन्वयाने काम करणेचा प्रयत्न केला आहे.मी पंचायत समिती जत कडे सन 1999 मध्ये हजर झालो असून आज अखेर 23 वर्षे त्यांचे बरोबर करणेची संधी मिळाली 




त्यांचे सोबत काम करत असतांना खुप ताकदीने तितक्याच सहजपणे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.त्यांचेकडे कुठलेली काम घेऊन गेले नंतर त्यावर त्यांनी पुर्ण अभ्यासाअंती ते निर्णय घेऊन मागदर्शन करीत होते.माझ्या सारख्या उमद्या व माझ्यातील नेतृत्व गुण हेरुन मला पतसंस्थेत व संघटनेत काम करणेची संधी देवून सतत सामाजिक व सांस्कृतीक व इतर वेळोवेळी समय सुचकता जाणुन माझे पाठीशी उभे राहून ते यशस्वीपणे पार पाडणेच्या बाबतीत अग्रेसर असत. विशेष करुन आम्हा कर्मचा-यांच्या बाबतीत कुटुंबातील एक सदस्य समजून काही कौटुंबिक प्रांपचिक अडचणीचेळी मदत करुन सुखदु:ख्याच्या प्रसंगी आमच्या सोबत असत तसेच त्यांचा तो स्पष्टवक्तेपणा देखील आम्ही अनुभवला आहे.



संघटनेचे अधिवेशन असो, किंवा विविध आंदालने असतील अथवा कर्मचा-यांचा अडीअडचणी असतील ते अधिकारी व प्रशासन यांचेशी समन्व साधुन चर्चेने प्रंसगी संर्घषाची भूमिका घेऊन त्याची सोडवणुक होणेच्या बाबतीत नेहमीच माझे पाठीशी खंभीरपणे उभे असत. विशेष करुन चर्तुर्थश्रेणी कर्मचारी /मैलकुली याबाबत त्यांचे अडअचणीचे वेळी मदत करणेची भावना असत. त्यांनी विविध संघटनेत पंचायत समिती कर्मचारी पतसंस्था व जि.प.कर्मचारी सोसायटी या ठिकाणी विविध पदे भूषविली असून त्या पदास न्याय देणेचा प्रयत्न केलेला आहे. आज अखेर केलेले मार्गदर्शन,निष्ठापूर्वक केलेली सेवा या सर्व प्रवासात झेललेले प्रत्येक क्षण व उदात्त प्रेरणा म्हणून असलेला एक आदर्श आमच्या पुढील वाटचालीस निश्चतीतच प्रेरणादायी ठरेल.आज आमचे मार्गदर्शक एम.डी.जेऊर सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा व सेवा निवृती नंतरचा काळात दिर्घायुष्य आरोग्यदायी जिवन लाभो हीच प्रार्थना.


शब्दाकंन

येथे फोटो लावा

श्री.आर.डी.कांबळे

कार्याध्यक्ष,

जि.प.कर्मचारी 4043



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here