नदाफ(टपाले)कुटुंबियाकडून जपली सामाजिक बांधिलकी | कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सलग दहाव्या दिवशी जेवनाचे वाटप

0जत,संकेत टाइम्स : कोरोना काळात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या पुढाकारातून कॉग्रेसच्या वतीने जत शहरातील जत येथील कोविड सेंटर, शासकीय रुग्णालय,आरळी हॉस्पिटल

चारही कोविड हॉस्पिटल मधिल रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना 

मोफत जेवन वाटप करण्यात येत आहे.कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडून हे जेवन वाटपाचे नियोजन केले जात आहे.

गेल्या दहा दिवसापासून कॉग्रेसचे शहर अध्यक्ष सलीम दस्तगीर नदाफ यांच्याकडून रुग्णालयातील नातेवाईकांना जेवन वाटप करत सामाजिक बांधिलकी नदाफ कुटुंबियाकडून जपण्यात येत आहे. सातत्याने सामाजिक कामात पुढे असणारे सलीम नदाफ यांनी पहिल्या कोरोना लाटेतही नागरिक शासकीय कार्यालयांना सँनिटायझर मशीन,मास्कसह कोरोना पासून बचावण्यासाठी उपकरणे वाटप केले होते.Rate Card
आता दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोरोना काळात मदतीचा हात दिला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,प्रसिध्द डाळिंब व्यापारी दस्तगीर नदाफ(टपाले),तहसीलदार सचिन पाटील,जि प.सदस्य सरदार पाटील, निलेश बामणे,जत शहर अध्यक्ष आकाश बनसोडे, इकबाल नदाफ,अनिकेत माने,सोहेल नदाफ,मोईन नदाफ,आरिफ पटाईत उपस्थित होते.

जत येथील कॉग्रेसचे शहर अध्यक्ष सलीम नदाफ यांच्याकडून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सलग दहा दिवसापासून मोफत जेवन वाटप करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.