जत : सांगलीच्या जतमधून अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काही दिवसांपासून जत मधल्या भाजपमध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात असा वाद पेटला होता. स्थानिक भाजपा नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देऊ नये अन्यथा बंडखोरी करू,असा इशारा दिला होता. मात्र आता भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच गोपीचंद पडळकर समर्थकांनी जत मध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे. तर उमेदवारीचा गोपीचंद पडळकर यांनी स्वागत करत, भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहे.‘जत तालुक्यामध्ये विकासाच राजकारण करू’,असा विश्वास यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.