जत : जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारा खरा विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर आहेत.जत शहराचा पाणी प्रश्न,उमदी एमआयडीसीचा प्रश्न, शहरातील नगरपालिकेची ज्यादा कर आकारणी रद्द करणे,तालुक्यातील रस्त्याचा अनुशेष भरून काढणे, गुड्डापूर श्री धानम्मादेवी,बिळूर भैरवनाथ परिसरासाठी विकास निधी असे अनेकविध प्रलंबित प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे.न भूतो न भविष्यती असा तालुक्यातला दिलेला विकास निधी देणारे व्यक्तिमत्व, काम करण्याची धमक, प्रचंड ऊर्जा स्त्रोत असणारे लोकप्रिय विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ आहेत. भारतीय जनता पार्टीने त्याला उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे.सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणाऱ्या ऐतिहासिक परिवर्तन रॅली काढण्यात येणार आहे.या ऐतिहासिक क्षण व परिवर्तनाचे शिलेदार होण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते,युवा उद्योजक महादेव हिंगमिरे व महिला सरपंच आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.वसुंधा हिंगमिरे यांनी केले आहे.
आ.गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बसवेश्वर चौक येथून संकल्प विजयाचा, मुहूर्तमेढ परिवर्तनाची परिवर्तनाच्या रॅलीत तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनी व युवक मित्रानी सहभागी व्हावे.जत तालुक्यात परिवर्तनाची लाट आहे,विकासाची पहाट पडळकर साहेबाच्या रूपाने उजडणार आहे.२०२३ च्या अर्थसंकल्पात शून्य निधी तरतूद असल्याने विधान परिषदेत पडळकर साहेबाचा आवाज गरजला. अन् त्यांच्या माध्यमातून जत तालुक्यात कोट्यवधीचा निधी बरसला. हे तालुक्यातील जनतेला माहीतच आहे. तालुक्यातील जनता सुज्ञ आहे,शेतकरी , कष्टकरी,मजूर,उपेक्षित वंचित घटकांची खात्री झाली आहे.तालुक्याला खमके नेतृत्व म्हणून पडळकरच असू शकतात. आमदार पडळकर यांचा जत विधानसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जनतेचे येणारे तूफान विजयापर्यत नेहणारे ठरणार आहे.तालुक्याच्या विकासासाठी आता पडळकर यांना साथ देण्याची निंतात गरज आहे.त्यामुळे गावागावातून हाजारोंच्या संख्येने या,असे आवाहनही हिंगमिरे दांपत्यांनी केले.