जत तालुक्यात धुवांधार पावसाची हजेरी

0जत‌,संकेत टाइम्स: जत शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. मात्र, शनिवारी सायंकाळी आकाशात ढग भरून आले होते. त्यानंतर साडे सहाच्या सुमारास धुवांधार पावसाने हजेरी लावली.जत‌ शहर डफळापूर, बाज,बेंळूखी,सह अनेक गावात पावसाच्या जोरदार सरीनी हजेरी लावली आहे.

सायकांळी आलेल्या पावसाने दमदार सुरू केली,तब्बल तासभर‌ पावस कोसळत होता.त्यामुळे अनेक समतल भागात‌ पाणी साटले होते.या पावसामुळे पुढील काही दिवसात खरीप हंगामाच्या पेरणीला गती येणार असून हंगामाच्या प्रांरभी मान्सून पुर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Rate Card
येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.