जत तालुक्यात कोरोना संक्रमण घटले, मृत्यूदर कायम

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही स्थिती लोकांसाठी दिलासादायक ठरणारी असली तरी कोरोनाने मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.दररोज होणारे मुत्यू भितीदायक आहेत.तालुक्यात शनिवारी करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत नवे 85 रुग्ण आढळून आले आहेत. तर 143 रुग्ण कोरोमामुक्त झाले आहेत.




तालुक्यात आणखीन तिघांचा शनिवारी मुत्यू झाला आहे.सध्या तालुक्यात 1106 रुग्ण उपचाराखाली आहेत.एकूण बाधित संख्या 9279 वर पोहचली असून 8250 जणांनी कोरोनावर मात केली आहे.पहिल्या व दुसऱ्या लाटेत‌ मिळून तब्बल 198 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.जत शहर,डफळापूर, माडग्याळ,उमदी,जाड्डरबोबलाद,बिळूर,कुणीकोणूर,उमराणीशेगावमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते.या गावातील नवे रुग्ण घटत आहेत.मात्र आणखीन काही दिवस खबरदारी घेण्याची गरज आहे.







जास्त रुग्ण असणाऱ्या गावात पोलीसाकडून निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या गावात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला.स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी,आरोग्य विभाग कडून उपाय योजना केल्या जात आहेत.जत तालुक्यात आता रुग्णालयातील रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. एकेकाळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते.


Rate Card




आता मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांतही अनेक बेड रिकामे आहेत.तालुक्यातील अत्यावश्यक सेवा 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू असून, इतर सर्व बाजारपेठा मात्र बंद असल्याने व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे हाल होत आहेत.1 जूननंतर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापारी व मजूर वर्गाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाने 1 जूनपासून पुन्हा पंधरा दिवस संचारबंदी 10 जूनपर्यत वाढविण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणती नियमावली लागू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र व्यापारी, उद्योजक, कामगार, मजूर वर्ग, दुकानदार संचारबंदीच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. 





आता जत तालुक्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पुढच्या आठवड्यात आणखी रुग्ण कमी होतील, अशी आशा आहे.तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा जत तालुक्यात उपलब्ध आहेत.


– सचिन पाटील, तहसीलदार



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.