जतच्या नव्या ठाणेदारांसमोर आवाहनाचा डोंगर

0जत,संकेत टाइम्स : जत पोलीस स्टेशनला नवे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांची नेमणूक झाली आहे.त्यांनी नुकताच कार्यभार स्विकारला आहे.जतचे पो.नि.उत्तम जाधव यांच्या निधनामुळे जतचे हे पद रिक्त होते.मुंबई,ठाणे,कोकण,आटपाडी,

कवटेमहांकाळ येथे कोळी यांनी यापुर्वी काम केले आहे. जत पोलीस ठाण्याची बिघडलेली प्रतिमा उजाळण्याचे मोठे आवाहन त्यांच्या समोर आहे.Rate Cardत्याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अद्यापही कायम आहे.त्यासाठी कोळी यांनी आक्रमक होत काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर ठाण्यात ठिय्या  मारलेल्या वसूली कलेक्टरांचा मोहजाळ्यात न येता अवैध धंदे रोकण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे मोठे आवाहन त्यांच्यासमोर आहे.आपल्या अनुभवाचा पुरेपुर वापर करून ठाण्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी पो.नि.कोळी यांनी प्रयत्न करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.