शून्याचा शोध तिसऱ्या शतकात

0
39

प्राचीन भारतीयांनी जगाला अनेक देणग्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये गणितामधील काही मूलभूत गोष्टींचा समावेश होतो. शून्याची देणगीही त्यापैकीच एक आहे. शून्याचा शोध भारतात आपण मानतो त्यापेक्षाही आधीच्या काळात लागला होता, असे एका प्राचीन भारतीय हस्तलिखितावरून स्पष्ट झालेले आहे. हे हस्तलिखित तिसऱ्या शतकातील आहे. तेव्हापासून शून्याचा वापर सुरू होता, हे लक्षात आल्याने गणिताचा इतिहास ५०० वर्षांनी मागे सरकला आहे, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे.

पाचशे वर्षे आधी भारतात शून्याचा शोध लागला होता. बाखशाली हस्तलिखित हे १८८१ मध्ये भारतातील बाखशाली खेड्यातील एका शेतात सापडले होते. आता हे गाव पाकिस्तानात आहे, तर हे हस्तलिखित १९०२ पासून ब्रिटनच्या बोडलियन ग्रंथालयात आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करून बाखशाली हस्तलिखितानुसार शून्याचे मूळ फार जुने असल्याचे स्पष्ट केलेले आहे. हे हस्तलिखित तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे. त्यात शून्याचा वापर केलेला आहे. नवीन कार्बन डेटिंग तंत्राच्या मदतीने ते त्यापेक्षा जुने असल्याचे दिसून आले आहे. हे हस्तलिखित ‘बिर्च बार्क’ वर लिहिलेली ७० पाने आहेत.

भारतीयांनी मांडलेली कल्पना बाखशाली हे गणितातील सर्वात जुने हस्तलिखित मानले जाते.मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरच्या मंदिरातील भिंतीवर नवव्या शतकात शून्याचे चिन्ह कोरलेले दिसून आले होते. बाखशाली हस्तलिखितात जे बिंदू वापरले आहे ते शून्याचे निदर्शक आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक मार्कुस ड्यू सॉटॉय यांनी सांगितले की, शून्याची निर्मिती ही तिसऱ्या शतकापासून सुरू झाली. त्यावेळी भारतीयांनी ही कल्पना मांडली होती व नंतर ती आधुनिक जगाने उचलली. यामधून प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात गणिताची प्रगती किती मूलभूत पातळीवरून होत गेली हे दिसून येते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here