गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार | आठ महिने उलटूनही आरोपीला अटक नाही

0
290

कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिला गेल्या आठ महिन्यांपासून पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत असूनही तिला न्याय मिळत नसल्याची घटना समोर आली आहे. पोलिस आरोपीला अटक करण्याचे धाडस का दाखवू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पॉर्न फिल्म्समध्ये काम करणारा अभिनेता गौरव सिंग राजपूत (२८) याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये गुन्हा

या संदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गायके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपीने या अभिनेत्रीसोबत राजस्थानमध्ये हा गुन्हा केला आहे. आम्ही एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजस्थान पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.अभिनेत्रीवर शूटिंगदरम्यान कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला असा या अभिनेत्रीचा आरोप आहे. पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार करून आठ महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here