शिराळ्यात अखेर‌ बंड शमले,जतचे काय होणार..? | भाजपाला दिलासा,जतसाठी उपमुख्यमंत्री बंडखोरांशी संपर्क करणार का ?

0
439

सांगली: विधानसभा निवडणूकीत बंडखोरांचा सामना महायुती व महाविकास आघाडीलाही बसत आहे.दोन्ही प्रमुखांकडून बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शिराळ्यातही सत्यजित देशमुख यांच्या विरोधात बंड पुकारत सम्राट महाडिक यांनी उमेदवारी दाखल केली होती.गतवेळचा अनुभव पाहता भाजपाला बंडखोरी परवडणारी नव्हती त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली.

झालेल्या बैठकीत सम्राट महाडिक यांनी अखेर माघार घेतली आहे.भाजपला एक दिलासा देणारी एक घटना घडली आहे.सम्राट महाडिक यांनी या मतदार संघात बंडखोरी करत भाजपचे टेन्शन वाढवले होते. अखेर त्यांना थांबविण्यात भाजपाला यश आलं आहे.सम्राट महाडीक यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर शिराळा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईनंतर सम्राट महाडिकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जाहीर केले आहे. 4 नोव्हेंबर रोजी ते अर्ज माघार घेत सत्यजित देशमुखांचा प्रचारही करणार आहेत.येथे‌ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी दुंरगी लढत होणार आहे.

2019 च्या निवडणुकीत भाजपने शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिली होती.तर त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनासिंग नाईक हे विजयी झाले होते.मानसिंग नाईक यांना जवळपास 1 लाख मतं मिळाली होती.तर भाजपचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नाईक यांना 76 हजार मतं मिळाली होती. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले सम्राट महाडिक यांना तब्बल 46 हजार मतं मिळाली होती.लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना आघाडी मिळाली होती. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशिल माने हे पिछाडीवर होते.

त्यामुळे विधानसभेला आता ही आघाडी तोडण्याचे आव्हान महायुतीच्या उमेदवाराचे असणार आहे. त्यातच सम्राट महाडिकांनी माघार घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे.आता चुरशीची लढत होणार आहे.सत्यजित देशमुख गड‌ भेदतात‌ का मानसिंगराव पुन्हा बाजी मारणार हे निकालानंतर ‌स्पष्ट होणार आहे.तत्पुर्वी महाडिक यांच्या माघारीनंतर देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जतची बंडखोरी रोकणार का?

जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे तम्मणगौडा रवीपाटील व प्रकाशराव जमदाडे यांनी बंडखोरी केली आहे.शुक्रवारी मंत्री चंद्रकांत दादा यांनी बंडखोरांची भेट घेत माघार घेण्याची विंनती केली मात्र रवीपाटील व जमदाडे‌ अपक्ष‌ लढण्यावर ठाम आहेत.आता जतची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.ते त्यांचे अगदी जवळचे नेते असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी कशी ‌शिष्टाई करतात याकडे‌ राज्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील पहिली सभाही जत येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here