उमदीत अखेर आमदार विक्रमसिंह सावंत यांनाच बळ | माजी जिल्हा परिषद सदस्याने शेकडो‌ कार्यकर्त्यासह ‌दिला पाठिंबा

0
506

जत : उमदी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात केलेले आमदार विक्रमसिंह सावंत यांना उमदी जिल्हा परिषद मतदार संघात‌ बऱ्याच पडझडीनंतर मोठी ताकत मिळाली असून या भागात मोठा प्रभाव असलेले ताकतवान नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर ‌यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बैठक घेत आमदार विक्रमसिंह सावंत यांना जाहीर पांठिबा दिला असून आमदार विक्रमसिंह सावंत यांचा हक्काच्या असणाऱ्या या जिल्हा परिषद मतदार संघातून मोठे मताधिक्य देऊ असे आश्वासन अँड.होर्तीकर यांनी दिले.

जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दुसऱ्यावेळी अध्यक्षपद‌ होर्तीकर यांच्या कुंटुबांत मिळाले होते.होर्तीकर कुंटुबियांचा मोठा प्रभाव या परिसरात आहे.त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांना येथे‌ मोठी ताकत मिळाली असून एक एक जोडणी करत आमदार सावंत विरोधकासमोर मोठे आवाहन उभे करतानाचे दिसत आहे.दरम्यान संखनंतर उमदीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या गटाचा‌ पांठिबा आमदार विक्रमसिंह सावंत यांना मिळाला आहे.या दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती.

 उमदी ता.जत येथे संपूर्ण महाविकास आघाडीच्या बैठकीस आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित राहून आयोजित बैठकीला संबोधित केले. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी अनुकूल असे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपने जे तोडा फोडीचे राजकारण केले आहे ते नागरिकांना कदापि मान्य नाहीये.

फक्त पक्षच नाही तर कुटुंब देखील फोडण्याचे काम या घटनाबाह्य सरकारने केले आहे. हि निवडणूक आपल्याला पूर्ण ताकतीने आणि आघाडीचा धर्म पाळून लढायची आहे, तसेच २३ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे असा विश्वास यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट ) यांनी जाहीर पाठिंबा दिला म्हणून त्याचे आभार मानले.यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here