सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांनी 184 उमेदवारी अर्ज भरले होते. बुधवारी झालेल्या छाननीत 184 अर्ज वैध ठरले होते.आज 3 वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात अपक्ष अर्ज दाखल आहेत.अनेकांनी पक्षाच्या जाहीर उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे.त्याशिवाय एकसारख्या नावाच्या उमेदवारांचही अर्ज अडचणीचे ठरू शकत असल्याने त्यांचीही मनधरणी करण्यात येत आहे.जिल्ह्यातील आठही मतदार संघातील अपक्षासह आघाडी,युतीसह स्व:क्षातील उमेदवारांचे अर्ज माघार घेण्यासाठी आज दिवसभर प्रयत्न होणार आहेत.संध्याकांळी पुर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.उद्यापासून प्रचाराला गती येईल.