जतमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अभूतपुर्व सभा होणार 

0
506

महादेव हिंगमिरे यांची माहिती

महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या‌ प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस याची आज जत येथे सभा होत आहे,या सभेला अभुतपुर्व अशी गर्दी होणार असून तालुक्यात आतापर्यतची सर्वात मोठी प्रचार सभा असेल,अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे ‌यांनी दिली.

आमदार गोपीचंद पडळकर हे जतमध्ये महायुतीचे अधिकृत्त उमेदवार आहेत.त्यांना तालुक्यात मोठा प्रतिसाद‌ मिळत आहे.विकास करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.जत तालुक्याचा राज्यात लौकिक करायचा असेलतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय पर्याय नाही,असे‌ सांगून हिंगमिरे म्हणाले,अशा राज्यातील मुलूख मैदानी तोफ असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची तोफ जत तालुक्यात धडाडणार आहे.

जत येथील एसआरव्हीएम कॉलेजच्या भव्य अशा मैदानावर ‌या सभेचे आयोजन केले आहे.तालुक्यातील भाजप किंबहुना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक मतदार या‌ सभेला उपस्थित राहणार आहे.त्यामुळे तालुक्यातील आतापर्यतच्या गर्दीचे‌ सर्व उच्चांक मोडून इतिहास रचेल अशी तूफान गर्दी आजच्या‌ सभेत पाह्याला मिळणार आहे.अर्ज‌ भरण्याच्या दिवसापासून पडळकर नावाचे तालुक्यात वादळ आले असून त्याचा मोठा ‌विजय निश्चित आहे.

तालुक्यातील तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी सामान्याचे नेतृत्व असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांची ‌लाट आली आहे.या लाटेत अनेकजण वाहून जातील असेही हिंगमिरे म्हणाले.तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी या सभेला शांततेत उपस्थित रहावे,सभा संपल्यानंतरही शांततेत घरी परतावे,कुठेही गालबोट लागू नये,याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी,असे आवाहनही हिंगमिरे यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here