उदगिरी शुगर साडेसात लाख टन ऊस गाळप करणार

0
108

डॉ.शिवाजीराव कदम | बाराव्या गळित हंगामाचा काटा,मोळी पूजन उत्साहात

विटा : मौजे बामणी (पारे), ता.खानापूर, जि.सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या बाराव्या गळीत हंगामाचा काटा पूजन व मोळी पूजन समारंभ सोमवार दिनांक 4 नोव्हेंबरला कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुल कदम यांचे शुभहस्ते व माजी आमदार सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.श्री सत्यनाराण पुजा श्रीसत्यनाराण पुजा कारखान्याचे इजिनिअर हणमंत शंकर वाघ व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे शुभहस्ते करण्यात आली.

कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी उपस्थित मान्यावारंचे स्वागत केले.त्यांनी प्रास्ताविकामध्ये  कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिनी 5 हजार मे.टन इतकी असून डीस्टीलरी 1 लाख 50 हजार केएलडी क्षमतेची आहे.  कारखाना सहवीज निर्मिती 14 मेंगा वँटचा आहे. या सिझन करिता सर्व तांत्रिक कामे पूर्ण झालेली असून कारखाना गाळपास सज्ज आहे. ऊस तोडणी व वाहतुकीकरिता मजूर व बैल गाडी ट्रक्टर व मशिनरी पुरेशी यंत्रणाही तयार असल्याची माहिती दिली.यावेळी बोलताना संस्थापक डॉ.शिवाजीराव कदम‌‌ म्हणाले,या हंगामामध्ये एकूण साडेसात लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ्ये ठेवण्यात आलेले आहे.

आजअखेर कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय बाबीची नोंद घेऊन कारखानाच्या विविध विभागास तांत्रिक,आर्थिक व्यवस्थापन व पर्यावरण उर्जा निर्मिती पुरस्कार व मानांकन प्राप्त झाले आहे.कारखान्याने आतापर्यंत एफआरपी प्रमाणे एकरक्कमी ऊस बिल पेमेंट केलेले असून ऊस पुरवठादारास अल्प दराने साखरही वितरीत केली आहे.गतवर्षीच्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून मोलाची मदत केलेली आहे.डॉ.राहुल कदम यांनी सांगितले प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांशी एक अतूट नाते निर्माण झाले असून कारखानाविषयी समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करणे साठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू साबळे सर.  जे.के.बापू जाधव,आबासाहेब चव्हाण,  दिलीपराव पाटील,डी.एम.माने,आर.एम.पाटीलसर,आनंदराव सांळुखे,खरमाटेसर,माउली सूर्यवंशी,गजानन सुतार,दौलतराव यादव  अभिजित शिंदे,महाविर शिंदे,आनंदराव शेळके,विटाचे नंदकुमार पाटील,सुरेश पाटील,शरद शहा अशोक पाटील निवासनाना पाटील यांचे सह कडेगांव, पलुस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व हितचिंतक सर्व विभाग खाते प्रमुख, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले.

उदगिरी शुगरच्या बाराव्या गळित हंगामाचा काटा पूजन व मोळी पूजन प्रसंगी डॉ.शिवाजीराव कदम,वनश्री मोहनशेठ कदम,डॉ.राहुल कदम,माजी कुलगुरू साबळेसर,जे के बापू जाधव. उत्तम पाटील व अन्य मान्यवर  

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here