वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण विभागात नोकरी देतो, असे सांगून खोटी नियुक्ती पत्रे व बनावट परमिशन लेटर देऊन ४५ तरुणांना ११ लाख ७५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सय्यद नूरमहंमद शेख (वय ३४, रा नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली) व सलीम गामूर चाऊस (वय ३२, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद उदय राजाराम लाड (रा. भडगाव, ता. कागल) यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.
सय्यद शेख याने फिर्यादीस आपण नागरी संरक्षण विभाग व वाहतूक नियंत्रण संघटनेचा महाराष्ट्र राज्य सचिव असल्याचे सांगितले, तर या संघटनेत काम करत असल्याचे सलीम चाऊस याने सांगितले. त्यांना या संघटनेच्या कोल्हापूर विभागप्रमुखपदी तसेच फिर्यादीच्या मेहुण्याचा मुलगा प्रफुल्ल सखाराम पाटील याची वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण या संघटनेच्या कोल्हापूर विभाग सचिवपदी नियुक्ती करतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपये घेतले. पोलिस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे अधिक तपास करीत आहेत.
सिक्युरिटी गार्डचे बनावट नियुक्तीपत्र
फिर्यादीमार्फत अन्य ४५ तरुणांना १८हजार ५०० रुपये मासिक पगारावर सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी लावतो म्हणून प्रत्येकाकडून २५ हजार रुपये वेळोवेळी फोन पे. गुगल पे तसेच रोख घेऊन त्यांना बनावट नियुक्ती पत्रे दिली