अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास २५ वर्षे सक्तमजुरी

0
162

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सदाशिव अशोक सनदे (वय २५ रा. मिसाळवाडी,आष्टा) याला २५ वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश क्र. १ श्रीमती अचला काशीकर यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी सदाशिव सनदे याने अल्पवयीन मुलीस घरी एकटी असल्याचे पाहून तीला आरोपी सदाशिव सनदे गोड बोलून तिच्यावर वेळोवळी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केले.

झालेली घटना कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेच्या आईने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयीत आरोपी सदाशिव सनदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र.१ श्रीमती अचला काशीकर यांच्या समोर झाली. यामध्ये सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

यामध्ये फिर्यादी, पिडीता व इतर साक्षीदार तसेच पंच, डॉक्टर व तपासी अंमलदार स.पो.नि.महेश गायकवाड यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या पुराव्यानुसार सनदे यास २५वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here