पडळकरांना २५ हजारावर ‌लीड द्या,मंत्री करायची जबाबदारी माझी | भाजपाच्या‌ मोठ्या नेत्यांचे जतकरांना आवाहन

0
826

जत : जत मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांना 25 हजारापेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून दिल्यास मंत्रिमंडळात घेण्याची जबाबदारी माझी असेल,असे आवाहन जत येथील भाजप बूथ कमिटीच्या विजय संकल्प मेळावा दरम्यान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महामंत्री विनोद तावडे यांनी केले.जत येथील डॉक्टर रविंद्र आरळी यांच्या शैक्षणिक संकुल येथे आयोजित जत मतदार संघातील बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते.

यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की ज्या पद्धतीने केंद्रात मोदी सरकार काम करत आहे व राज्यात अडीच वर्षे काम केले हे सर्वांना माहीत आहे.त्यामुळे मतदारांनी मतदानाच्या रूपाने पाठीवरती थाप मारली पाहिजे हे लोकांपर्यंत जाऊन सांगणे गरजेचे आहे गेल्या दहा वर्षात सरकार चालवत असताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप सरकार वरती झालेला नाही देशात अनेक पायाभूत सुविधा देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.

बूथप्रमुखांना मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले प्रत्येक बुधप्रमुखांनी प्रभाग निहाय यादी काढून घरोघरी कुटुंबातील यादी काढून लोकांना ते पटवून देऊन त्यांच्याकडून 100% मतदान करून घेण्याची जबाबदारी ही बूथप्रमुखांची राहील ते काम त्यांनी व्यवस्थित पार पाडावे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे डॉ रवींद्र आरळी आमदार गोपीचंद पडळकर, याचबरोबर मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here