जतमध्ये ‘एकच छंद गोपीचंद’ चा नारा… | प्रचारात तरुणाईचा उत्साह; विकासाच्या मुद्याला प्राधान्य

0
279

जत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच भाजपने आ. गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. आक्रमक भाषणशैलीमुळे तरुणाईमध्ये आ. पडळकर यांची वेगळी क्रेझ आहे. आ. पडळकर प्रचारात आघाडीवर आहेत. तरुणांचा त्यांना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंबामुळे जतमध्ये कसे काय? असं म्हणताच पलिकडून एकच उत्तर येते जतमध्ये ‘एकच छंद गोपीचंद’ ची हवा जोरात आहे. आ. पडळकर यांनी जतच्या राजकीय पटलावर आक्रमकपणाऐवजी विकासाचा अजेंडा ठेवल्याने आ. पडळकर समर्थकही रिचार्ज झाले आहेत. आ. पडळकरच या निवडणुकीत बाजी मारणार, असा विश्वास युवा नेते संजय तेली, लक्ष्मण जखगौड, आण्णा भिसे सद्दाम अत्तार, दीपक चव्हाण, भाऊसो खरात, अक्षय आवटे व अनेक तरुणांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

महायुतीचे उमेदवार आ. पडळकर यांचा अर्ज दाखल करताना मोठी गर्दी झाली होती. जतच्या इतिहासात प्रथमच उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गदर्दीत एकच छंद गोपीचंद हा नारा गाजला. प्रचारादरम्यान गावात जाताच आ. पडळकर यांचे जंगी स्वागत होत आहे. कुलाळवाडी येथे तर, आ. पडळकर यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. आ. पडळकर यांच्या प्रचारात गावोगावी तरुण घरोघरी जावून प्रचार करताना दिसत असल्याने गाव व वाडया वस्त्यांवर जोरदार आ. गोपीचंद पडळकर यांची हवा निर्माण झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आ. गोपीचंद पडळकर हे जतमध्ये प्रचाराची धुरा संभाळत असताना कोणावरही टीका, आरोप-प्रत्यारोप न करता जतच्या विकासाचा अजेंडा त्यांनी जनतेसमोर मांडला आहे. माझे विरोधक हे जत तालुक्यातील कोणी व्यक्ती नाही.तर माझा विरोधक जतचा दुष्काळ आहे, ४० हजार लोकांच्या हातातील कोयता आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला मला काम द्यायचे आहे, त्यांच्यासाठी उद्योग उभा करायचे 

आहेत. जत शहराला महाराष्ट्रातील एक नंबरचा विकसनशील तालुका करायचा आहे. उमदीला दोन हजार एकरावर एमआयडीसी उभा करायची आहे. उमदी एमआयडीसीमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या पाहिजेत, जत तालुक्यात दोन सूतगिरणी, नवीन आरटीओ कार्यालय, पूर्व भागात स्वतंत्र बस डेपो आदी विकासाची संकल्पना आ पडळकर यांनी प्रचारादरम्यान मांडत जतला विकासाची नवी दृष्टी देण्याचे अभिवचन ते मतदारांना देत आहेत. जतच्या विकासाचा मुद्दा घेवून आ. पडळकर हे मैदानात उत्तरले आहेत. त्यांच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होताना दिसत आहे.

सर्वसमान्यांचा आधारवड आ.पडळकर

– दौलतनाना शितोळे 

महाराष्ट्रातील राजकारणात आक्रमक पडळकर हे सर्वसामान्यांचे आधारवड आहेत.जतच्या विधानसभा निवडणुकीत एक नवा इतिहास घडणार आहे. आ.गोपीचंद पडळकर हे सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास रामोशी समाजाचे राज्याचे नेते, नरवीर उमाजीराजे नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केला आहे. जत तालुक्यातील अनेक गावात अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी भेट देत आ. पडळकर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आ. पडळकर यांच्या प्रचारासाठी शितोळे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here