लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे यांची माहिती
जत : जतमध्ये भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्यांनी लिंगायत समाजाने निवडून द्यावे,त्यांचा विजय हा लिंगायत समाजाचा आमदार बनवणारा ठरणार आहे.जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर निवडून आल्यास जमधिल एका लिंगायत समाजाच्या नेत्यास विधानपरिषदेची आमदारकी मिळणार आहे.
त्यामुळे कोणत्याही भूलथाफाना बळी न पडता एकसंघपणे लिंगायत समाजाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभे रहावे,असे आवाहन लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे यांनी केले.
हिंगमिरे म्हणाले,जतमध्ये मोठे प्राबल्य असणारा आमचा लिंगायत समाज आहे.आतापर्यत या समाजाला सर्वच बाबतीत वंचित ठेवण्यात आले आहे.जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या नेत्यांना आमदार करायची हीच चांगली संधी आली आहे.लिंगायत समाजाचे भाजपा सरकारने महामंडळ स्थापन करून न्याय दिला आहे.
जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर हे विजयी झाल्यास तालुक्यातील एका लिंगायत समाजाच्या नेत्याला विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी मिळणार असून भाजपा नेतृत्वाकडून तसे संकेत दिले आहेत.त्यामुळे जत तालुक्यातील सर्वच लिंगायत समाजातील मतदारांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ द्यावी,असे आवाहनही हिंगमिरे यांनी केले आहे.