आमदार गोपीचंद पडळकर यांना डफळापूर मतदार संघातून लीड देणार | – दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण

0
327

डफळापूर : डफळापूरसह पश्चिम भागातील सर्वच गावात भाजपाचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांना या जिल्हा परिषद मतदार संघातून तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार,अशी माहिती पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व बाजार समिती संचालक अभिजीत यांनी दिली.

जत तालुक्याचा खऱ्या अर्थाने सर्वागिंन विकास करायचा असेलतर आमदार गोपीचंद पडळकर शिवाय पर्याय नाही.विकासाचे व्हिजन असलेले आमदार म्हणून पडळकर यांची ओळख आहे.गेल्या अगदी सहा महिन्यात कशा विकास योजना आणायच्या याची झलक त्यांनी दाखविली आहे.तालुक्यात रखडलेले अनेक प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर हे मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

देशात राज्यात आता भाजपाचे सरकार असणार आहे.जतमधून निवडून येणार आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री असणार आहेत,हे निश्चित आहे.यामुळे राज्यात जतला नंबर वन बनण्याची संधी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आली आहे.

त्यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याने ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेतच,डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातून आम्ही सर्वाधिक लीड देऊ,असेही दिग्विजय चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here