जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव खाली येतानाचे चित्र असून शुक्रवारी तालुक्यात 92 रुग्ण आढळून आले आहेत.दुर्देवाने तब्बल 11 जणांचा मुत्यू झाल्याने मुत्यू संख्येत वाढ कायम आहे.
गेल्या तीन दिवसापासून कोरोना नवे रुग्ण कमी होत असताना मुत्यू दर वाढ चिंताजनक आहे.तालुक्यात पुन्हा नव्याच्या दुप्पट 195 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या तालुक्यात 1183 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1006 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.कोरोनामुक्त टक्केवारी 86 टक्के आहे.तालुक्यातील एकूण बाधित संख्या 9213 वर पोहचली आहे.
नवे रुग्ण असे, जत 21,अचनहळ्ळी 3,निगडी बु.1,वळसंग 2,रामपूर 1,संख 1,पांढरेवाडी 1,दरिबडची 1,आंसगी जत 1,बागलवाडी 5,शेगाव 5,कासलिंगवाडी 1,गुळवंची 1,बनाळी 2,आंवढी 1,प्रतापपूर 2,उमदी 3,उटगी 1,बालगाव 3,को.बोबलाद 1,तिकोंडी 2,जालिहाळ बु.1,माडग्याळ 3,सोन्याळ 1,व्हसपेठ 2,जा.बोबलाद 1,बिळूर 3,खोजानवाडी 1,उमराणी 1,सिंदूर 1,गुगवाड 1,कुडणूर 1,शिंगणापूर 1,डोर्ली 2,खलाटी 1,वाषाण 1