संभाजीकाका माळी,कृषी भूषण,समाजप्रिय व्यक्तिमत्व हरपले

0डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन तथा कृषी भूषण,शेतीला आधुनिकतेची जोड़ देत अविष्कार ‌केलेले डफळापूरचे काका संभाजीराव धोंडिबा माळी यांचे वयांच्या 75 व्या आकस्मिक निधन झाले.

डफळापूर गावात अनेकांच्या‌ मदतीला धावणारे,तब्बल 40 माणसाच्या कुंटुबांचे कुंटुब प्रमुख असलेले संभाजीकाका माळी यांचे ह्रदयविकाराच्या आजाराने मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी प्राणज्योत मावळली.


सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय,व मदतप्रिय व्यक्तिमहत्व म्हणून काकाचा‌ नावलौकिक आहे.

तीन भाऊ,एक बहिण अशा कुंटुबांतील संभाजी काका तीन दशकापुर्वी गुऱ्हाळघर चालवित होते.त्यावेळी त्यांची वडिलार्जित तीन एकर शेती करत त्यांनी व्यवसाय संभाळत तीन दशकात अपार कष्ठाच्या बंळावर तीन एकर जमिनीचे क्षेत्र सुमारे 60 एकर जमिनी पर्यत वाढविले आहे. नुसते‌ क्षेत्र नव्हे तब्बल तीस एकर द्राक्ष,वीस एकर ऊस,मका अशी पिके घेत कोटीत उत्पादन घेण्याचे यशस्वी प्रयोग काकांनी यशस्वी करून दाखविले आहेत.

शेतीतून कोट्यावधीचे उत्पादन घेऊन त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.त्यांना शेतीतील महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने गौरविले आले आहे.सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यत काका डफळापूरमध्ये चौफेर विकुरलेल्या

त्यांच्या शेतीत कार्यरत असायचे,अनेक नव्या शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळायचे.

Rate Card

गावातील राजकारणात काका सक्रीय होते, ते स्व:ता सोसायटीचे सलग 35 वर्ष सदस्य आहेत,सोसायटीचे व्हा.चेअरमन, ग्रा.पं.सदस्य म्हणूनही त्यांनी राजकारणात उपलब्धता दाखविली होती.त्यांच्या मोठ्या सुनबाईना जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काकांनी निवडून आणले होते.त्यांच्या मोठ्या ‌कुंटुंबातील एकतरी सदस्य ग्रामपंचायतीत असतोच.गावातील निवडणूकीत त्यांच्या शंब्दाला मोठे वलयं होते.ते जिकडे असायचे त्यांच्या पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर असायची.

डफळापूर येथील साधे,दानसूर व्यक्तीमहत्व म्हणून काकांची गावात ओळख आहे.त्यांनी गावातील मंदिरे,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम,गरजवंताना सढळ हाताने मदत‌ करत असत.ते राहत असलेल्या परिसरातील पन्नासवर कुंटुबातील प्रत्येक सुख,दु:खाच्या घटनेत ‌काकांचा पुढाकार असायचांच,त्यांच्या सल्ल्या शिवाय कार्यक्रम होत‌ नसतं.

विजार,शर्ट,होंडा कंपनीची अगदी जूनी दुचाकी असा पेहराव काकांच्या साधेपणांची साक्ष देते.गावातील स्टँड लगत नातूच्या कृषी दुकानातील कट्ट्यावर काकांची बैठक असायची.तेथे अनेक शेतकरी,राजकीय नेते,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक कांकाना भेटायचे.अशा सामाजप्रिय लोक हिच आपली श्रींमती माननाऱ्या संभाजी काका माळी यांचे निधनाने संपूर्ण गावावर शौककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात

पत्नी,दोन भाऊ,तीन बहिनी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नांतवडे असा मोठा परिवार आहे.शंब्दाकन : राजू माळी,संपादक संकेत टाइम्स

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.