भिवर्गी फाटा एसटी पिकअप शेडची दुरावस्था

0भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी फाटा ता.जत येथील एसटी पिकअप शेड बेवारस पडले असून वाऱ्याने पत्रे उडून गेल्याने फक्त भिंती उरल्या आहेत.तातडीने या पिकअप दुरुस्त करावे,अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य बाळेनिसिध्द बिराजदार यांनी केली आहे.


बिराजदार म्हणाले,संख ते तिकोंडी रस्त्यावर असणाऱ्या भिवर्गी फाटा येथे हे शेड उभारण्यात आले होते.गेल्या काही दिवसापुर्वी आलेल्या वादळात त्यावरील सर्व पत्रे उडून गेले आहेत.भिंती निकृष्ठ कामाच्या साक्ष देत आहेत.भिवर्गी येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांना सध्या यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.

पुढे येणारा पावसाळ्याचा काळ आहे.त्यामुळे तातडीने या पिकअप शेडची दुरूस्ती करावी,अन्यथा आंदोलन करू,असा इशाराही बिराजदार यांनी दिला आहे.


Rate Card
यावेळी संरपच मदगोंड सुसलाद, उपसंरपच बसवराज चौगुले,पोलीस पाटील श्रीशैल चौगुले,युवा नेते कुमार पाटील,बाळासाहेब सुसलाद,नांदेप्पा चौगुले,प्रकाश चौगुले उपस्थित होते.


भिवर्गी फाटा ता.जत येथील एसटी पिकअप शेडची दुरास्था झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.