२० वी फेरी | कॉंग्रेस नेत्यांना मतदारांचा मोठा तडाखा | जतमध्ये यंदा गोपीचंद पर्व 

0
636

जत विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार दिनांक २० रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली.आज ता.२३ ला मतमोजणी होत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजयकुमार नष्टे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली जतमध्ये जूने धान्य गोडावून येथे मतमोजणी सुरू आहे

उमेदवार निहाय चौदावी फेरीतील मतदान
१) आमदार गोपीचंद पडळकर : १०९७६४
२) आमदार विक्रमसिंह सावंत : ७२६६१
३) तम्मणगौडा रवी पाटील  : १८५६९

आमदार गोपीचंद पडळकर यांना ३७ हजार १०३ मताची आघाडी 

मतदारसंघात यावेळी ऐतिहासिक विधानसभा निवडणूक झाली होती आटपाडी येथील आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याने स्थानिक नेत्यांनी भूमिपुत्राचा मुद्दा पुढे निवडणूक लढवली होती मात्र गोपीचंद पडळकर हे जत तालुक्याच्या विकासाच्या व्हिजन घेऊन मैदानात आले होते. विधान परिषदेवर आमदार असतानाही त्यांनी जत विधानसभा लढवण्याचे शिवधनुष्य उचलले होते. निवडणूक लढवण्या अगोदर त्यांनी मोठा विकास निधी देत अनेक गावात मी कसा विकास करू शकतो याचे उदाहरण समोर ठेवले होते.जतचा कळीचा मुद्दा असणारा बेरोजगारी संपवण्यासाठी त्यांनी उमदी येते पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करून आणत मोठे यश मिळाले होते.

या भागातील हाजारो तरूणांच्या हाताला काम देण्याचे वचन दिले होते.त्याचबरोबर जत शहरात पाणीटंचाई संपविण्यासाठी मोठी पाणी योजना मंजूर करण्यात त्यांनी योगदान दिले होते.त्याचबरोबर त्यानी गावागावात कसा विकास करू शकतो त्याचे प्रात्यक्षिकच प्रचारात दाखवले होते. जतचे नाव राज्यात झळकावतो,मला एकवेळ संधी द्या,ही घोषणा मतदाराने तंतोतंत पाळत त्यांना मोठा विजय मिळवून दिला आहे.जतच्या राजकीय इतिहासात गोपीचंद पडळकर यांनी मोठा विजय संपादन करत सुवर्ण अक्षराने नोंद केली आहे.

जत विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २९१३६३ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार हे १५२४०९ असून स्त्री मतदार हे १३८९५१ मतदार आहेत असून इतर ३ मतदार आहेत. काल झालेल्या सकाळी ७.०० ते ६.०० च्या दरम्यान एकूण २१०९०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १११७८० पुरुष,९१११९ स्त्री तर इतर १ अशा एकूण २,१०,९०० मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी ७२.३८ आहे.

जत विधानसभा मतदार संघात, महायुती कडून आमदार गोपीचंद पडळकर, महाविकास आघाडी कडून आमदार विक्रमसिंह सावंत तर तम्मणगौडा रवी पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तिन्ही तुल्यबंळ उमेदवारामुळे मोठी चुरसीने मतदान झाले होते. तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here