जतमध्ये यंदा परिवर्तन, आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय 

0
454

जत‌ : जत विधानसभा निवडणुकीत यंदा मोठे परिवर्तन झाले असून जतचे कॉग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवला आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी 1 लाख 11 हजार 906 मते मिळवत तब्बल 37,901 मतानी विजय मिळवला आहे.

त्यामुळे इथून पुढे पाच वर्ष तालुक्यात गोपीचंद पर्व,एकच छंद गोपीचंद असा नारा घुमणार आहे.जत तालुक्यात विकासाचे मोठे स्वप्न दाखवलेले गोपीचंद पडळकर यांना पूर्ण करण्याचे मोठे आवाहन असणार आहे.जत विधानसभा निवडणुकीत बाहेरील उमेदवार,जातीवादी उमेदवार,गुन्हेगार उमेदवार असे अनेक आरोप करत गोपीचंद पडळकर यांचे यांना रोखण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला.

मात्र विरोधकांचे सर्व चक्रव्यूह भेदून आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभेचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत.त्यांच्या विजयाचा तालुकाभर जल्लोष सुरू असून जनसामान्यांचा नेता म्हणून जनतेने त्यांना डोक्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले.आमदार गोपीचंद पडळकर यांना तब्बल 37901 मताची आघाडी मिळाली असून जत तालुक्यात प्रथमच एवढा मोठा विजय आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिळवला आहे.

दुसरीकडे जतचे विद्यमान काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना मतदारांची नाराजी भोवली असून गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेले यांच्यावर केलेले आरोप हे जनतेला मानवले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.तालुक्यात विकास करणाऱ्या माणसाला विजयी करण्याची परंपरा मतदारांनी कायम ठेवली आहे.पोस्टल मतमोजणी वगळता आमदार गोपीचंद पडळकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी राहिले.

288 : जत मतदारसंघ

फेरी क्रमांक : 21

1) गोपीचंद पडळकर(भाजप): 111906

2) विक्रमसिंह सावंत(काँग्रेस): 74025

3) तम्मनगौडा रवीपाटील(अपक्ष): 19120

विजय – गोपीचंद पडळकर(भाजप): 37881

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here