संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीमधील लढत असलेल्या जत विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी ३८ हजार २४० मताधिक्यांनी विजय झाला. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जतमध्ये चौथ्यांदा आ.पडळकरांच्या रुपाने कमळ फुलले.
आ.पडळकर यांना दोन लाख १० हजार ९०० मतदानांपैकी एक लाख १३ हजार ७३७ मते मिळाली. तर सावंत यांना ७५ हजार ४९७ मते मिळाली. भाजपचे बंडखोर उमेदवार तम्मणगौडा रविपाटील यांना १९ हजार ४२६ मते मिळाली, तम्मणगौडा रविपाटील यांची खिंड भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लढवली होती तर भाजपमधून इच्छुक असलेले जिल्लहा बँकेचे संचालक प्रकाश जमयाडे यांनी सावंत यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. भूमिपुत्र विरुद्ध विकासपुत्र विरुद्ध स्वाभिमानी जनता असा लढा प्रचारात रंगला.
आ.पडळकर हे बाहेरचे (आटपाडी) चे उमेदवार असल्याने जोरदार सामना रंगला पण या लढतीत आ. पडळकर यांनी विक्रमी विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत हा गड भाजपच्या ताब्यात घेतला.
पश्चिम महाराष्ट्रात सुरेश खाडे यांच्या रुपाने पहिल्यांदा कमळ जतमध्येच फुलले होते. त्यानंतर प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप यांनी कमळ फुलवले. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी बाजी मारली होती. पण या निवडणुकीत पुन्हा आ.पडळकर यांनी कमळ फुलविण्याची किमया केली.
उपरा उमेदवार, गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार म्हणून विरोधकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली. २१ पण आपण जतच्या जनतेला विकासाचा जो अजेंडा दिला तसेच महायुतीने जे काम केले त्याची पोचपावती दिली आहे. जतच्या जनतेने विकासाला कौल दिला असून जतचा विकास हाच ध्यास मनी ठेवून काम करू.
आ. गोपीचंद पडळकर,भाजप उमेदवार
जतच्या जनतेने दिलेला हा कौल आपणास मान्य नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपला पराभव होणे शक्य नाही. पाच वर्षे आमदार म्हणून जनतेच्या सुखदुःखात आपण सहभागी झालो तर, महायुतीचे उमेदवार अवघ्या दोन महिन्यात विजयी होतात, हे गणित मनाला पटण्यासारखे नाही. हा भाजपचा विजय नसून ईकीएममध्ये झालेल्या घोळाचा विजय आहे.
- – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस उमेदवार