करजगी : जत विधानसभेच्या निवडणूकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचे करजगी येथे जल्लोष करण्यात आला.
भाजपाचे तरूण,राज्याची मुलूख मैदानी तोफ व जतचे विकासपुत्र म्हणून लौकिक मिळविलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना तालुक्यातील जनतेनी मोठे मताधिक्य देत विजयी केले आहे.त्या यशाचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे.त्याचबरोबर राज्यातही महायुतीला मोठे यश मिळाले आहे.करजगीतीही भव्य रँली काढण्यात आली.
गुलालाची उधळन,फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.आमदार पडळकर यांना 21 व्या फेरी अखेर 37 हजार 901 पेक्षा अधिक मताने आघाडी घेताच भाजप कार्यकर्त्यांनी करजगी मध्ये जोरदार जल्लोष सुरू केला आहे.
यावेळी सरपंच चन्नाप्पा पट्टणशेट्टी, सोसायटी चेअरमन भीमाशंकर मेढेदार,जंगाप्पा जंगमशेट्टी इराप्पा जेऊर, सायबणा जेऊर, माळू कळळी, नागप्पा हंजगी,सोमु बमनाळे, सिदराया पट्टणशेट्टी,रमेश बमनाळे,रामू गुरव,उत्तम कट्टीमनी, सुरेश अक्कलकोट, रमेश सायगाव,श्रीशैल पटनशेट्टी,मल्लाप्पा जेऊर,सुरेश जेऊर, इराप्पा अक्कलकोट , मल्लिकार्जुन अक्कलकोट,सदाशिव तानाजी,सुनील अक्कलकोट,भीमाना बसर्गी आधी करजगी ग्रामस्थ व बीजेपी कार्यकर्ता उपस्थित होते.
करजगी ता.जत येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.