आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार
जत : मुंबई येथे सागर निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जतचे नुतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. यावेळी नामदार फडणवीस यांनी जत विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल आमदार पडळकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले.यावेळी माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत, दौलत नाना शितोळे, सागर खोत उपस्थित होते.
तुम्ही माझ्या गोपीचंदला निवडूण द्या,जत तालुक्याच्या विकासाची माझी गँंरटी अशी घोषणा करत गोपीचंद पडळकर यांना मोठे बळ दिलेले व राज्यात पहिली सभा जतमध्ये घेत धक्का दिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले.फेडा भरवत सत्कार केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाकेला साद देत जतकरांनी साधासुधा नाहीतर तब्बल ४० हजारांच्या आसपास मताधिक्य देत आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी केले आहे. फडणवीस यांचा शब्द जतकरांनी पाळला असून जतचा विकास करण्याची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नुतन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर असणार आहे.विकासाची भूक कायम असलेल्या या तालुक्यात गोपीचंद पर्व परिवर्तन आणेल असा विश्वास येथील जनतेला असल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,हा विजय एक सुरुवात आहे, जतकरांच्या आकांक्षांचा विजय आहे.दुष्काळावर मात करण्यासाठीचा हा विजय आहे. बेरोजगारीला उत्तर देण्यासाठीचा विजय आहे. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. माझ्यासोबत अनेकजण खांद्याला खांदा लावून लढले. माझ्यावरचे अनेक वार छातीवर झेलले त्यांचा भाऊ म्हणून सोबत असेल.गरीब वंचितांचा आवाज विधानसभेत कायम घुमणार याची ग्वाही देतो. जत हा शेवटचा नाही तर राज्यातला पहिला तालुका असेल यासाठी जिवापाड प्रयत्न करेल. गरीबावर अन्याय होणार नाही अन अन्याय करणाराला सोडणार नाही हा शब्द गोपीचंद पडळकरचा आहे,असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
फोटोओळी
मुंबई येथील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केला.