आमदार गोपीचंद शंभरावर गावांत करिष्मा | आमदार विक्रमसिंह सावंत २१ गावातच प्रभाव | मंत्रीपदाची ‌जतकरांना ओढ

0
383

जत : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदारसंघावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचा झेंडा फडकवला आहे. तब्बल १ लाख १३ हजार ७३७ इतकी मते घेत तालुक्याच्या इतिहास्यतील ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पाडळकर यांनी प्रतिस्पधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३८ हजार ४५३ मतांनी पराभव केला आहे. भाजपचे विद्यमान आमदार पडळकर यांनी जत शहरासह तालुक्यातील १०१ गावांत पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेतले आहे. काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांना केवळ २१ गावांत आघाडी मिळाली आहे.

अपक्ष उमेदवार तम्मणगौडा रवी-पाटील यांच्या जाडरबोबलादसह सोन्याळमध्ये अवघ्या दोन गावांत मताधिक्य मिळाले आहे. परिणामी माजी आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. एकंदरीत या निकालाचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीत.

आ. पडळकर यांनी जत शहरासह डफळापूर, बिळूर, उमराणी, मुवंडी, संख, उमदी, माडग्याळ, शेगाव, बाज, बाळेखिही या गावांतून मोठे मताधिक्य घेतले. तसेच आ. पडळकर यांना कुरताळवाडी येथे ११०३ मते मिळाली आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सावंत यांना अवधी ८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार रवी पाटील १ इतके मत मिळाले आहे. पडळकर यांनी १३ गावांत ९० टक्क्यापेक्षा अधिक मते घेतली आहेत.

विकासाचे व्हिजन असलेल्या भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने स्वीकारले. आजपर्यंत जत तालुक्याला कधीही मंत्रिपद मिळाले नव्हते. आत्ता मात्र पडळकरांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत जतकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसने घेतल्या दिग्गजांच्या सभा

एकीकडे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार विक्रम सावंत यांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामव्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील, कांता नाईक, कर्नाटकाचे आमदार, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा मक्षणा सलगर यांच्यासह डझनभर स्टार प्रचारक प्रचारासाठी उत्तरले होते. मात्र जनतेने त्यांना स्वीकारले नाही.

दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार विलासराव आ. गोपीचंद पडळकर जगताप यांनी उम्मणगौडा रवी पाटील यांच्या बंडखोरीला भूमिपुत्राच्या मुद्दधावर खतपाणी घातले. रवी पाटील यांनी लिंगायत समाजाचा मुद्दा उपस्थित करत, भूमिपुत्राचा मुद्दा जनतेसमोर घेऊन गेले.

पडळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. टोकाचा विरोध केला. मात्र त्यांना जनतेने साफ झिडकाराले. विजयाचा दावा करणाऱ्या स्वी-पाटील यांना २० हजारांच्या आत गुंडाळावे लागले, हे मात्र विशेषच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातील बहुजन नेते व ओबीसी चळवळीचा फॅक्टर असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीत उतरण्याअगोदरच डफळापूर येथून पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, परसराम चव्हाण, बनाळीचे मिलिंद पाटील, विक्रम ताड, माडग्याळचे विठ्ठल निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांची साथ घेतल्याने मराठा समाजाने हे निरपेक्ष भावनेने जातीपातीच्या पलीकडे जाऊन सहकार्य केले. याचबरोबर रिपाइंचे नेते संजय कांबळे, मुस्लिम समाजाचे नेते सत्लीम गवंडी यांनीही आपल्या समाजाची ताकद पडळकर पांच्या पाठीशी उभा केली, त्याचबरोचर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे निवडणूक अंतिम रप्प्यात असताना जत शहरातून व तालुक्यातून राष्ट्रवादीचे नेते मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी साथ दिली.

मराठा समाजाचा प्रभाव असलेल्या डफळापूरसह बनाळी, वाळेखिडी,शेगाव,या मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांचा जलवा दिसून आला. मात्र मराठा समाजाने ही काँग्रेसकडे पाठ फिरवली, पास कारण सावंत यांच्याबद्दल नाराजीची किनार होती.

जत तालुक्यातील गावनिहाय आकडेवारी अशी, महायुती भाजपचे उमेदबार आमदार गोपीचंद पडळकर, काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत अनुक्रमे बेवनूर १४१७, ५६२, नवाळवाडी २५७, १४१, बाळेखिंडी १४०४,१४०१, सिंगनहळ्ळी १०४८, ५४८, लोहगाव, चव्हाणवाडी ५४२, ७७५, आवंडी ५३४, १२०६, येलखी ११६८, ६८२, सौराव ७८५, ३२५, जाडरबोबलाद ११६५, ९१८, विठ्ठलवाडी ३९९,२६२, उमदी ३३४९, २३६५, सोनलगी ८७२, ४३९, मुसलाद ८३६, ९५७, निगडी बुद्रुक, लमाणतांडा १०३५, ४५९, उटगी १३७९, ११९९,

लकडेवाडी ५३३, १७६, टोणेवाडी ३०९, ३२२, मोकाशेवाडी ६४, २७२, बागलवाडी ३७२, १७२, काशिलिंगवाडी ३६९, २४६, गुळवंची ७६६, ३४४, प्रतापपूर ४५६, ३३०, भावडवाडी १०२, ४१९, कोसारी १५७८, १०४८, शेगाव १६७३, १४६१, बनाळी ६८२, १२७०, अंतराळ ३१७, ४७१, वायफळ ५१९, ५८४, घोलेश्वर ४९६, २४०, सनमडी ९४४, ५२२, मापधळ १९२, १२७, कुणिकोणूर ५९६,२३७, आबाचीवाडी ४३३. २२, सोन्याळ ११६३, ८०६, लमाणतांडा (उटगी) २२३, ८२, हळ्ळी ९३८, ४२६, बालगाव १०९३, ५६०, बेंळोडगी ९०७, ४९०, कुलाळवाडी ११०३, ८, माडग्याळ १४८५, १२७८

काराजनगी ७०८, ४६९, निगडी खुर्द ६५५, ७१८, अचकनहळ्ळी ७५२,५७८, रेवनाळ १२८५, २१९, तिप्पेहळ्ळी ३५६, ४२७, बिरनाळ१०५७, १२५, कुंकुंभारी ११७५, ११२९, हिवरे ७५३,३३५, डोर्ली १०६७, ३४०, अंकले ११३१ 

५७९, बाज ३१२७,२९६, बागेवाडी ९६७, १६९, कंठी १२९०, १२२, जत शहर ८५५३, ८३२८, बळसंग ९८०, ७७२, कोळगिरी ५१३, ३८३, व्हसपेठ ५८३, ४५६, गुहापूर ४४३, ३९२, राजोबाचीवाडी ४४९, ५३, अंकलगी ७९७, ७८०, करजगी १३२९, ११११, बोर्गी बुद्रुक ४०८,२३९, बोगी खुर्द ३८२, २८२, अक्राळवाडी ४३३, २२८, माणिकनाळ ३९२,२४०, मोरवगी ७४२. ३१२, भिवर्गी १२४८, ५४२, संख २६७२, १७३१, गोंधळेवाडी ४२४, ३०३, आसंगी (जत) ९२६, ७३२, तिल्याळ २९६, २४७, सोरडी ९०६, ६९१, सेहधाळ ७१२.२७५, सालेकिरी ३०४, २९७,

पाच्छापूर ३१९, ४१९, अमृतवाडी ३७६, ३९७, मल्ललाळ २९१, ९२, रामपूर १०१७, ४९२, बाषाण ५९५, ५२, खलाटी १०७८, ३९६, बेळुंखी ८६७, ७५६, डफळापूर २५८९, १७९६, कुडणूर ८७४, २१६, शिंगणापूर ९१३, ३२७, शेळकेवाडी ४१२, ६४, मिरवाड ४९६, २४९, जिरम्याळ ९४३, ५०२, साळमाळगेबाडी ६७१, २३७, येळदरी ७८४, ४०८,

मेंडेगिरी ५७३, ५४७, देवनाळ ४११, २०७, दरिकोणूर ५४१.८२९, दरीवडची १५४४, १६०४, लमाणतांडा (द.ब.) १९८, २७९, खंडनाळ ७७३,२८५, पांडोझरी ७०१,१९०, करेवाडी (ति) ५६४, १५३, जालिहाळ बुद्रुक ५९२, ५२४, गिरगाव ६१७, ७८५, लवंगा ३०३, १३८. गुलगुंजनाळ २३३, १३३, करेवाडी (को.बी.) १०६१, ४६, तिकोडी ७५८, ७६७, पारधेवस्ती (पांडोझरी) २७५,९९, मोटेवाडी (असंगीतूर्क) ७३९, १२३, पांढरेवाडी १०१०, १३३.

जालीहाळखुर्द १६५, २५८, सिद्धनाथ ६४०, ९१०, मुचंडी १५३७, ८४०, रावळगुंडवाडी ९६५, ७८४, उंटवाडी २२१, ३६१, खोजनवाड़ी ४५३, ३०२, बिळूर ३७०५, २८०५, खिलारवाडी ६६१, १५६, एकुंडी ८२३, ४८२, बज्रवाह ८१४, ५६१, गुगवाड १२८१, ११४५, बसर्गा ९३६,४३५, सिंदूर १३५५, ८७३, उमराणी २१३५, १४९६, धुळकरवाडी ३६३, २४६, आसंगी तूर्क ३११, २३९, कागनरी ५३३, ४५६, कोणबगी २२९, ८१, को. बोबलाद, मोटेवाडी १०६९,५८८. 

टपाली मतात पडळकर पुढेच…..

टपाली मतात गोपीचंद पडळकर पुढेच राहिले. आमदार पडळकर ४३ मताधिक्य मिळाले.. एकूण २४१७ पैकी ९९१ मते पडळकरांना मिळाली. ९४८ मते सावंत यांना मिळाली…. एक फेरी वगळता प्रत्येक फेरीत पडळकर यांनी आपाडी घेतली होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here