जत पोलीस ठाण्याला कधी मिळणार वरिष्ठ अधिकारी
जत,संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उत्तम जाधव यांच्या आकस्मिक निधनापासून ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पद रिक्त असून दुय्यम अधिकारी कोरोना सारख्या प्रभावी लाटेत कसाबसा कार्यभार हाकत आहेत.त्यांना वरिष्ठ अधिकारी नसल्याने मर्यादा पडत असून ठाण्याचे नियत्रंण यामुळे सुटल्याचे चित्र आहे.
दुय्यम अधिकारी वरकमाईकडे जास्त लक्ष देत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत आहे.
शहरासह तालुक्यात कोरोनाचे थैमान कायम आहेत.दररोज रुग्ण वाढत आहेत.अशात बेपर्वार्ह नागरिकांचा वावर रोकण्याची जबाबदारी पोलीसावर आहे.मात्र अपवाद वगळता काही अधिकारी,कर्मचारी पुतळे उभारल्या सारखे कोरोना विरोधात काम करत असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे.आरोग्य,महसूलचे अधिकारी एकीकडे रात्रीचा दिवस करत असतानाही पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष धोका वाढवत आहे. सध्या तालुक्यात मटका,तीन पानी जुगार,गांज्या,वाळू,गुटखा तस्करी सुसाट असून अनेक घटनाचे तापास संथ गतीने सुरू आहेत.अवैध धंदे चालकांचा ठाण्यातील काही अधिकारी कर्मचाऱ्या सोबतचा वावर बरचं काही सांगून जात आहे.ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी सिंघम स्टाईल,कडक शिस्तीचा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी जतला द्यावा,अशी मागणी होत आहे.

सर्वच दुय्यम अधिकाऱ्यांचे वसूलीकडे लक्ष
जत पोलीस ठाण्याला वरकमाईची लागण अनेक वर्षापासून आहे.गेल्या अनेक वर्षापासून तळ ठोकलेल्या कर्मचाऱ्यांकडून नव्या अधिकाऱ्यांना या वसूलीसाठी इमान इतबारे मार्गदर्शन केले जाते.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे काही महिन्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापेक्षा वरकमाईकडे जास्त लक्ष लागते.आताही तसेच झाले असून नियंत्रण नसलेले दुय्यम अधिकारी अनेक ठिकाणी दिवसा,रात्री,मध्यरात्री नाकाबंदी,राऊंडच्या नावाखाली फिरताना दिसत आहेत.मात्र कारवाया रेकार्डवर कुठेही दिसत नसल्याचे वास्तव आहे.
