डफळापूरमध्ये वार्ड निहाय आरोग्य तपासणी सुरू | दोघे कोरोना बाधित आढळले ; पुढील चार दिवस चालणार मोहिम

0



डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर येथे वार्डनिहाय नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. डफळापूर येथे कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.त्यापार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून गावातील वार्डनिहाय नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.





यात ताप,अंगदुखी,खोकला अशा रुग्णांची अन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे.गेल्या दोन दिवसात सुमारे 100 वर नागरिकांची टेस्ट करण्यात आली,त्यात दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.मात्र यामुळे दोन वार्डमधील नागरिकांची सुरक्षिता आणखीन मजबूत झाली असून कोरोना सदृश आजाराची लक्षणे असणारे रुग्ण या तपासणीतून शोधणे शक्य झाले आहे.



Rate Card



पुढील काही दिवसात संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी शक्य तेथे अन्टिजन टेस्ट करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना रुग्ण वाढीचा आकडा कमी करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी पथकाला सहकार्य करावे,कुणीही कोरोना सदृश लक्षणे अंगावर काढू नयेत,प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत,असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.




डफळापूर येथे आरोग्य तपासणी दरम्यान कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.